मन का बुध्दि.......
आत्ता खरं तर अजिबात वेळ घालवू नये इतकं काम आहे. पण काय करणार .... काही गोष्टी तुमच्याशी शेअर केल्याशिवाय बर वाटत नाही. गेले दोन दिवस एक विचार डोक्यात घोळतो आहे. तुम्ही पण विचार कराल असाच विषय आहे तो. ''मनाला बुध्दिचा लगाम घालायला हवा'' हाच तो विचार. कारण मनात येईल तसं वागल्यानी ब-याचदा वाट चुकण्याची भीती असते. पण मनातल्या विचारांना बुध्दिच्या तराजूत तोलल्याने बरेच प्रॉब्लेम टळू शकतात.
आपल्या आयुष्यात कधीही न घडणा-या गोष्टींचं हवेपण आपल्याला असतच. मनही याच गोष्टींकडे धाव घेतं. पण प्रॅक्टिकली , सद्य परिस्थितीमध्ये हे हवेपण आपण कसं मिळवू शकू हे आपल्याला बुध्दिच सांगु शकते. कारण मनाचं तंतर लईच न्यार असतय हो. त्याला काय काहीही हवं असतं. पण आपल्या बुध्दिला विचारायला हवं एकदा तरी, की काय गं बाई , हे सगळ शक्य आहे का ? कदाचित बुध्दि जे उत्तर देईल ते आपल्या मनाविरूध्द असेलही. पण भावना, विचार, संवेदना ताडून बघायला हवं. कारण एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा कितीही विचार केला तरी उपयोग होत नाही. त्यापेक्षा निदान आयुष्यातले अति महत्त्वाचे निर्णय घेताना तरी मन आणि बुध्दि दोन्हीचा विचार करायला हवा. काही जण म्हणतील, आपलं मन आपल्याला कधीच फसवू शकत नाही. पण मित्र मेत्रिणींनो या मनाचं काही सांगता येत नाही बर का ..... त्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी ते आपल्याला बिनधास्त सांगत, अरे जा पुढे .... काही नाही होत... जास्तीत जास्त काय होईल? मग काय आपल्याला तेच हवं असत. काही वेळा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता असते. मन आपल्याला चुकीचा निर्णय देतं असं नाही. पण मनाला जरा दोन मिनीट होल्ड करून बुध्दिशी कॉन्टॅक्ट करून निर्णय घ्यावा. तिनी हिरवा कंदिल दाखवला ना की मग गाडी सोडायला हरकत नाही. त्यानी होणा-या दुर्घटना टळतातच असं नाही . पण निदान आपण नीट विचार करून निर्णय घेतला आहे याचं समाधान तरी मिळत. संत तुकाराम या प्रॅक्टिकली अध्यात्म सांगणा-या संतानी आपल्या अभंगातून हाच विचार मस्त मांडला आहे...
शुध्द करा मन देहातित व्हावे । वस्तु ती ओळखावें तुका म्हणे ॥

No comments:
Post a Comment