आधार......
कित्येक वेळा आपल्याला आधाराची गरज वाटते. म्हणजे कोणी कितीही स्ट्रॉंग , सक्षम असलं तरीही. म्हणजे भावनिक आधार ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण कित्येक वेळा नेमक्या अशा वेळीच कोणी नसतं. असं का होतं ? या प्रश्नाचं उत्तरदेखील मिळत नाही. एरवी बोलायला , भेटायला अगदी व्याकूळ असणारी माणसं अचानक गायबच होतात. त्यांच्या जागी त्यांच्या अडचणी कितीही बरोबर असल्या तरी...... वरातीमागून घोडं काय कामाचं ? ......असंच होत खूपदा.
मन मनास उमगत नाही.... आधार कसा शोधावा ...... हे गाणं ... हो....... हीच ती भावना....... स्वप्नातील पदर धुक्याचा..... हातात कसा हो यावा....... आधार कसा शोधावा ...... पण काय करणार ? मनातल्या अनेक भावनांची, प्रश्नांची उत्तरं आपली आपल्यालाच शोधायला लागतात.
मला ना खूपदा असं वाटतं. जेव्हा जे हवं तेव्हा ते न मिळणं यालाच जीवन म्हणतात. कारण हवं तेव्हाहवं ते मिळालं तर कदाचित त्याची मजा निधून जाईल. पण प्रत्येक वेळी नाही बॉस. कधी तरी, दे साद दे हृदया...... असं होऊ दे की राव.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं असतं , अरे आमच्या बाबतीत सुध्दा असच होतं. हवं तेव्हा हवं ते मिळतच नाही. हे ऐकून फार बरं वाटलं . म्हणलं चला आपल्याच घरात लाईट नाहीत असं नाहीये. सगळ्या गावाचीच वीज बंद आहे. मग हरकत नाही. कारण माणसाची ही सहज प्रवृत्ती आहे. नगरपालिकेचं पाणी फक्त आपल्याच घरात नसेल तर त्रास होतो. पण आख्ख्या बिल्डींगला पाणी नाही म्हणलं की मग बरं वाटतं.... म्हणजे अहो, टॅंकर वगैरे आणता येतो. तुम्हाला काय वाटतं ,
दुस-याचं दुःख पाहून मला आनंद होतो. नाही हो....तसं नाही. पण निदान काही दुःख तरी कॉमन असावीत म्हणून बोलले.
आत्ता हे सगळ लिहितानाच एका मैत्रिणीचा अनपेक्षित फोन आला. चक्क आधार वाटला. ती मला खूप मिस करतीय असं ती म्हणाली. अगं काय हे कुठे आहेस तू ? असं म्हणाली. तुझा आवाज ऐकावासा वाटतोय गं... असं म्हणाली. कंटाळा आला असेल तर माझ्याकडे ये गं, असं सुध्दा म्हणाली.
म्हणजे हे सुध्दा खरं आहे की आधार असतो. फक्त आपल्याला हव्या त्या व्यक्तिने दिला नाही म्हणून आपण उगाच रडतो. असं वाटत असत की , समोरच्या माणसाला आपली किंमत नाहीये. या विचारानी मन अस्वस्थ असतं. पण त्याच वेळी दुसरं कोणीतरी स्ट्रॉंगली आपली आठवण काढत असतं. किंबहुना आपल्याशी बोलायला आतुर असतं. वा ..... हे छान आहे. मग मी मनाला समजावलं.......जो है वो पल जी ले.....

No comments:
Post a Comment