प्रेरणा ...........
आपल्या आयुष्यात आपल्याला कितीतरी माणसं भेटतात. काही पटकन आपले होऊन जातात. काहींना आपण ओळखू शकत नाही. काहींना ओळखूनही ते अनोळखी रहातात. हे सगऴं असं का याला काही उत्तर नाही. टेलिपथी ज्यांच्याशी जुळते त्यांच्याशी सूर जुळतात. काही लोकांशी मात्र प्रयत्न करूनही सूर नाही जुळत.
आपण नेहमी सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेबद्दल बोलतो . काहींना भेटल्यावर खूप मस्त वाटतं तर काहींना भेटल्यावर वैतागल्यासारखं होतं. काही खूप प्रेरक असतात तर काही 'कुरकुरे'.
माझ्या बाबतीत एकाच अभिव्यक्तिबाबत अशा दोन टोकाच्या व्यक्ति भेटल्या. एकानी मी एकही शब्द नीट लिहू शकत नाही असा शेरा मारला. तर एकानी ब्लॉग लिहिण्याची प्रेरणा दिली. पहिल्या व्यक्तिचा अनुभव विदारक होता. मी गेली काही वर्षे पत्रकारिता करतीय. अगदी परिपूर्ण नाहीये मलाही माहितीय. पण त्यांनी.... मी माझी विदवत्ता पाजळण्यासाठी लिहिते, मी वाचकांचा विचार करत नाही, माझा अभ्यासच नाहीये असं काहीसं बोलून माझा लिखाणाचा आत्मविश्वास जवळपास संपवला होता. कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटतं कारण माणूस हा स्तुतीप्रिय असतो. कौतुक आवडत नाही असा माणूस मी तरी पाहिला नाही. कौतुक केल्यानी उत्साह वाढतो. कामासाठी प्रेरणा मिळते. अगदी काहीही लिहू न शकणा-या माझ्यासारखी माणसंसुध्दा लिहू लागतात. पण नकारात्मक प्रतिसादामुळे एक चूक झाली की दुसरी चूक करतोय की काय अशी भावना मनात घर करून बसली.
यापुढे मी लिहू शकणार नाही असं वाटत असतानाच याच क्षेत्रातल्या एका अनुभवी व्यक्तिने फेसबुकवरच्या माझ्या एका कॉमेंटवर मस्त प्रतिक्रिया दिली. ओळख वाढली आणि चक्क मी बरं लिहू शकेन असं वाटायला लागलं. आपलं आयुष्य कोणा एकाच व्यक्तिवर अवलंबून ठेवायचं नसतं हे या एंजलनी सांगितलं. 'क्विन' हा सिनेमा बघायला सांगितला. तो सिनेमा बघून खुप मोकळ वाटलं. वेगळा दृष्टिकोन मिळाला. आपल्यामध्ये असणा-या सृजनशीलतेला मोकळी वाट करून देणं अशक्य नाही असा विश्वास वाटला. मुख्य म्हणजे मोकळेपणा जो मला नेहमीच आवडतो तो गवसला. यापूर्वीअशाच एका व्यक्तिने मला जगायचं कसं हे शिकवलं . अगदी वाईट परिस्थिती असली तरी आयुष्य आनंदानी कसं जगाव हे सांगितलं. 'नेहमी आनंदी रहा' हे माझं नाही तर त्या व्यक्तिचं तत्वज्ञान आहे. आता पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टी देणारी व्यक्ति भेटली आणि वेगळ्या लिखाणाला वेग आला.
या सगळ्यांच माझ्यावर ऋण आहे. अगदी छापील वाक्य आहे , पण त्यांच्या ऋणात रहाणं मला आवडेल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अशी अनेक माणसं भेटतात, यापुढेही भेटतील. पण या सगळ्याचा आनंद घेऊन आयुष्याची वाट चोखाळायला शिकवणा-या सगळ्यांसाठी मनापासून सलाम......

Nakkich changla lihu shakta...Subhecha pudhil lekhachi vat pahu..
ReplyDelete