'स्व' चा मस्त शोध
सुख हे मानण्यावर असतं असं म्हणतात. पण अगदी विचित्र परिस्थितीत माणूस अडकला की सुख कसं मानायचं हेच कळत नाही. पण अशा अवस्थेतून आपल्याला जर कोणी बाहेर काढू शकत तर ते म्हणजे आपण स्वतः. हो खर आहे. अनुभवानी सांगतीय. आपल्या आजुबाजुला असणारी माणसांची गर्दी यासाठी मदत करत नाही. ते गाणं आहे ना, ''मी एकटीच माझी असते कधी कधी, गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी. तसं होतं. माझं होतं ''
असाच 'स्व' गवसलेला आणि ख-या अर्थानी जगणं शिकवणारा एक मस्त सिनेमा पाहिला, 'क्विन'...... राणी. कंगना राणावतनी तुमच्या माझ्या मनातल्या जगण्याच्या कल्पना खुप छान साकारल्या आहेत. काही कारणांनी आत्मविश्वास गमवलेल्या तुमच्या, माझ्या सारख्या सगळ्यांना प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे.
सिनेमा पहातानाच आपल्यातला आत्मविश्वास वाढतो. कोणा एकावर प्रचंड अवलंबित्व किती घातक असतं हे आपण अनुभवलेलं असत. पण नव्यानी जाणवतं. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तिला आपण खुप जास्त महत्त्व देतो. मात्र त्यानीच आपला विश्वासघात केला तर.... मग सहाजिक प्रचंड निराशा येते. या निराशेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कोणीही मदत करत नाही. ती मदत आपली आपल्यालाच मिळवावी लागते. आणि एक जाणवतं , की ही मदत कोणी एकानीच करावी अशी आपण अपेक्षा का करतो? आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला वेगवेगळी माणसं भेटतात. मोकळ्या मनानी या सगळ्याचा स्वीकार करून आयुष्य आनंदी कसं करता येईल. हा शोध क्विन मध्ये लागल्याचं मला जाणवलं.
मी काही सिनेमाचं परीक्षण लिहिणारी नाही. पण मनापासून सांगते या सिनेमानी खरच एका वेगळ्या विश्वात नेलं. अभिनय, लोकेशन्स, पात्र सगळच खुप मस्त वाटलं. भाषा भावनेपेक्षा मोठी नाही हे जाणवलं. संवाद साधण्यासाठी भावना महत्त्त्वाची . भाषा नाही. आनंद मिळविण्यासाठी आपण कोणावरही अति अवलंबून रहाणं बरोबर नाही. हे पटलं. मनापासून पटलं. त्यामुळेच फार विचार करण्यापेक्षा समोर येणा-या परिस्थितीत आपण आनंदी कसं राहू शकतो याचा विचार केलेला चांगलं. माझ्या मनातसुध्दा नेहमी असा विचार येतो. दुःखी अवस्थेत रहाण्यापेक्षा जगेन तर आनंदानी नाहीतर नाहीच.
फारच छान... नेमकं मर्म पकडलंय या सिनेमाचं... वाहव्वा...
ReplyDelete