तरूण आहे......
काल माझ्या बॅचमेटस मैत्रिणींनी एक भन्नाट विषय डोक्यात घुसवला. सहज बोलता बोलता एक जण स्वतः अगदी आजीबाईच्या जमान्यात असल्यासारखी बोलली. माझं थोड ऑबजेक्शन होतं. मी म्हणलं, काय गं म्हातारी झालीस का ? तर म्हणे, स्वीकारायलाचं हवं ना , वगैरे , वगैरे. मी म्हणलं कशाला म्हातारं व्हायचं उगाच ? वय होईनाकी कितीही... मन तरूण हवं.
या सगळया विषयातून एक गोष्ट जाणवली, खूप वेळा आपण उगाच मोठ्ठं होऊन ब-याच गोष्टींचा आनंद घेतच नाही. आपलं वय खूप झालय असं वाटून अनेक गोष्टी मनमोकळेपाणानी करतच नाही. हो लिहिताना अजून एक गोष्ट आठवली. आमच्या कलापिनी संस्थेत आमचे डॉ. परांजपे जेव्हा सुजाण पालक मंचाच्या कार्यक्रमात पालकांना मोकळ हसायला सांगतात, तेव्हा बरेच जण कसनुसं हसतात. वर हात करून टाळ्या वाजवायला सांगितल्या, तर टाळी वाजवल्याचा उगाच अभिनय करतात. काही गोष्टी मनाला तरूण करत असतील तर त्यातला आनंद घ्यायला लोक का कचरतात ?
माझं असं म्हणणं नाही की, आपल्याला न शोभणा-या गोष्टी करा. काय ते वासरात पाय मोडून घुसणे का काय ते. तसं नका करू. मोठ्यांनी मोठ्यांसारखच वागलं पाहिजे. पण निदान प्रौढ झाल्यासारखं नका वागू. हसावसं वाटलं हसा. बोलावस वाटलं बोला. त्याला वयाचा काय संबंध ?
आपल्यापेक्षा लहान असणा-यांच्या सहवासात रहायला हवं. मग हे मोठेपण गळून पडतं. त्यांच्यात त्यांच्यासारखं होऊन गेलात ना तर खूप मज्जा येते. मी मोठा आहे मग काय हा बालिशपणा ? असा विचार नका करू. त्यानी काय होतं माहितीय का ? आपण
ब-याचदा आपली नवीन स्वीकारण्याची क्षमता हरवतो. काय ही हल्लीची गाणी, काय हे सिनेमे, काय या हिरॉईन असे 'कुरकुरे' नका होऊ. त्यापेक्षा कधीतरी 'कुरकुरे' खा . आत्ताची गाणीसुध्दा चांगली आहेत . मुलांच्या दृष्टिकोनातून बघायला हवं. आत्ताच्या मुलांना ताल, ठेका, लाऊड म्युझिक आवडतं. कारण ती प्रचंड हायपर आहेत. त्यांना त्यांच्या या क्षमतेला साजेसच ऐकावसं वाटतं. पण आत्ताच्या काऴात सुध्दा अर्जित सिंगची गाणी ऐकायला मस्त वाटतच की. राधा मंगेशकर आत्ताच्या पिढीतली असूनही 'मीरा सूर कबीरा' सारखे दर्जेदार कार्यक्रम करतेच की. स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, संदीप खरे, डॉ. सलिल कुलकर्णी, संजीव अभ्यंकर, सावनी शेंडे, कवयित्री स्पृहा जोशी, अजय - अतुल, शंकर महादेवन, भाग मिल्खा भाग मधला फरहान अख्तर, सारेगमपची सगळी वादक टीम, धृपद गायक उदय भवाळकर, चेतन भगत, तरूण पॉलिटिशियन्स अरे बापरे ... अहो ही यादी संपणारच नाही. हे सगळे कल्पक आणि महान आहेतच ना ? पण हे सगळं तरूण वयापेक्षा तरूण मनानी बघायला हवं ना. 'अनवट' सिनेमातलं जुनं 'तरूण आहे रात्र अजून' हे गाणं शंकर महादेवननी चिरतरूण केलयं. उगाच नावं ठेवण्यात काय अर्थ आहे.
आत्ताच्या पिढीला समजून घेण्यासाठी स्वीकारार्हता वाढवायला हवी. आपली मतं त्यांना पटवून देण्यासाठी त्यांची मत ऐकायला हवीत. नव्या जुन्याचा संगम झाला तरच नवीन काहीतरी चांगलं घडेल. आपल्या आधीची पिढीसुध्दा आशिकी, दिल, दिवाना, कयामत से कयामत तक या सिनेमांना कुठे 'लाईक' करायची ? कधी तरी आपणही आपले मोठेपणाचे मुखवटे उतरवायला हवेत. जी माणसं येणा-या काळाशी आनंदानी जुळवून घेऊन पुढे जातात त्यांना' कुरकुरे' व्हावं लागत नाही. असा कुरकुरेपणा सोडा .... नाही तर मुलं म्हणतील.... आता माझी सटकली.... त्यापेक्षा अनवट चालीत आपण म्हणूया... तरूण आहे मन अजूनी.......

True words downloaded at its best .... everyone feels but only a few could express it....
ReplyDeleteU r one of them ..... keep writing
All d very best