Friday, 2 January 2015

मन..........


आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो..... चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो.... आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...... सलीलचं हे गाणं सारख आठवतय आज.... छे.... नववर्षाची अशी बोअर सुरूवात..... काम असलं म्हणजे खूप आणि नसलं म्हणजे काहीच नाही.... काय आहे हे ? मला ना खुप काम करायची सवय झालीय..... म्हणजे ते स्वतःच असेल असं नाही.... लष्करच्या भाक-याच फार असतात. (आमच्या अहोंच्या मते).... मला आनंद मिळतो ते खरच.... पण आजचा दिवसच जाम बोअर गेला. आज मला माझ्या सो कॉल्ड लष्करच्या भाक-या पण नाही भाजता आल्या. 
  सकाळपासूनच एक - दोन फोन कॉल्स नी जाम डोक आऊट केलं....   म्हणजे मी करून घेतलं. हे मात्र जाणवलं आज .....आपणच आपला मुड घालवतो आणि परतदेखील आणतो. बाहेरचा माणूस या सगळ्याला जबाबदार नसतो. आपण उगाचच समोरच्याला ब्लेम करतो. बाह्य परिस्थितीचा फार परिणाम करून घेतो आपण. काही गरज नसते त्याची. फक्त याचा साक्षात्कार फार उषीरा होतो. माणूस म्हणजे हे सगळ होणारच. पण तरीही .......... फार भडकून काही होत नाही... दोन घास आपल्यालाच कमी जातात. ज्या कारणामुळे डोकं फिरलय ते कारणच मार्ग सुचवत... पण विचारांच्या भोव-यात गुंतण्याआधी मन शांत करायला हवं..... स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी बाहेरचं कोणी नाही तर आपणच प्रयत्न करायला लागतो. त्यात आम्ही बायका जरा जास्तच संवेदनशील असतो. नाही त्या गोष्टींचा उगाचच विचार करत बसतो. 
माझ्या ओऴखीचे एक काका आहेत , ते नेहमी म्हणतात, समर्थांचा दासबोध वाचा.... आनंदी रहाण्याची गुरूकिल्ली आहे ती.... खरच आहे........ माणसानी आपलं वर्तन कसं ठेवावं आणि कसं ठेवू नये याबद्दल समर्थ रामदास स्वामीनी नि:संदिग्ध, खूप सविस्तर आणि मोलाचं मार्गदर्शन त्यांच्या  काव्यात केलं आहे. त्यांनी वारंवार मनाला संबोधित केलं आहे खरं.... पण इथे मन हे केवळ एक रूपक असून लेखन सगळ्या मानवजातीला उद्देशून केलं  आहे. समर्थ सांगतात असं जगता आलं तर..... 
मना मानसीं दु:ख आणूं नको रे। 
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥ 
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी। 
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी -      
समर्थांच्या या श्लोकावर विचार करता करता मनावरची मरगळ नाहीशी झाली.... खरच हे मन म्हणजे ना........                                                                             

No comments:

Post a Comment