आवडते मज माझी शाळा...........
काल एक खूप धमाल अनुभव घेतला. मी काल माझ्या शाळेत गेले होते. माझी शाळा भोरला आहे. '' राजा रघुनाथराव विद्यालय '' खरं सांगू, माझा वीकपॉईंट आहे ही शाळा. या शाळेनी जे भरभरून दिलं आहे, तेच आत्ता उपयोगी पडतय.
भोरमध्ये जातानाच विलक्षण आनंद होत होता. नदीवरचा तो पूल. तिथे घडलेल्या गमती जमती सगळं आठवत होतं. शाळेत गेले तेव्हा तर मला कसं रिअॅक्ट व्हावं तेच कळत नव्हतं. तो नोटीस बोर्ड, ती बाकं, ते ग्राऊंड. सगळे बोलत होते माझ्याशी. मी माझ्या शाळेशी खूप गप्पा मारल्या. तिथल्या बेंचवरून हात फिरवला. माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. तिथे मी म्हणलेली गाणी, नाट्यवाचनातला भाग, महाराष्ट्राची लोकधारा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा सगळ आठवलं. माझ्या वर्गातल्या मित्र मैत्रिणींना, त्या वेळच्या शिक्षकांना, शिपाई काकांना खूप मिस केलं. पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं.
आमच्या आत्ताच्या मुख्याध्यापकांनी बावीकर सरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. शाळेसाठी एक चांगलं काम करण्याची संधी मला मिळतीय. ती मी कशी सोडेन? सर म्हणाले, '' ये विनया.....'' धडधडायलाच लागलं मला. खरं तर मी घाबरायचं काही कारण नव्हतं. पण मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये काहीतरी उद्योग केल्याशिवाय जायला मिळायचं नाही. आज तर मी सो कॉल्ड मार्गदर्शन करायला जाणार होते. सरांसमोर काहीच बोलता येईना मला. शेवटी तेच म्हणाले, ''अगं, तू काही विद्यार्थिनी नाहीयेस आता. आज तू आमची पाहुणी आहेस.'' पोटात गोळाच आला. मी कसली पाहुणी ? तुम्ही सगळ्यांनी भरभरून दिलय आम्हाला. तेच पेरतोय आता. त्यानंतर आमच्या ढवळे सरांनी, ' ए विने' अशी हाक मारली. एक नंबर वाटलं मला. तिथले शिपाई काका मला मॅडम म्हणत होते. हसूच आलं मला.
त्यानंतर माझ्या सगळ्या शिक्षकांना नाट्य अभिवाचनाविषयी काही सांगायला मला बोलवलं होतं. ही एक मोठी गंमत होती. मला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांना मी काय सांगणार ? पण तरीही मनाचा निर्धार करून उठले. बोलायला सुरूवात केली. नॉन स्टॉप एक तास बोलत होते मी. तेही माझ्या शिक्षकांसमोर. नंतर एक वर्कशॉप घेण्याचं ठरवलं आम्ही. मुलांना हे सगळ सांगायला मिळणार, या कल्पनेनी मी खुष झाले होते. तेव्हा तर पूर्ण दिवसभर मी शाळेत थांबणारे........... यस्स........ त्यानंतर आमच्या एका सरांनी माझं कौतुक केलं. सगळ्याच शिक्षकांनी माझ्या शाळेत असताना केलेल्या गमती जमतींचा उल्लेख केला. छान वाटलं. कोणी कितीही कौतुक केलं तरी शाळेत कौतुक होण्यासारखं भाग्य नाही. खरचं मी खूप भाग्यवान आहे. हा अनुभव मला मिळावा यासाठी मला शाळेत बोलवण्याची कल्पना ज्यांच्या मनात आली, त्या विनोद वाघ सरांना मनापासून धन्यवाद..........

Apratim, Apan tithe upasthit asalyasarkhe vatale. Dolyasamor prasang ubha rahila. Khup chaan, Sundar. Nehamipramane.
ReplyDelete