थेंबे थेंबे तळे साचे.....
घरातल्या स्वयपाकघराच्याही बाहेर न पडणारी सखुबाई जेव्हा तीन ते चार हजार महिलांसमोर धीटपणे उभी राहून आपले विचार मांडते तेव्हा कौतुक आणि आश्चर्य वाटते. अगदी खेडयात रहाणा-या या महिलांमध्ये हा आत्मविश्वास आलाय तो महिला बचत गटांच्या माध्यमातून. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी व त्यांच्यातला आत्मविश्वास वाढविण्यासाठी बचत गटांनी फार मोठे काम केले आहे. आपणही पैसे कमवू शकतो व आपल्या कुटुंबाला हातभार लावु शकतो या कल्पनेने व प्रत्यक्ष कृतीमुळे ग्रामीण भागातील महिला धाडसी बनल्या आहेत. शहरातील महिला आपापल्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवित आहेत . त्यांचे कौतुक आहेच पण खरे कौतुक आहे ग्रामीण भागातील या महिलांचे ज्यांनी बचत गटांच्या माध्यमातून आपल्या कतृत्वाचा ठसा उमटविलेला आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात साधारण दहा वर्षांपूर्वी बचत गट मोहिम सुरु झाली. या छोट्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. जिल्ह्यातील 80 टक्के कुटुंबे या मोहिमेत सहभागी झाली आहेत. दर वर्षी शंभर कोटींपेक्षा अधिक उलाढाल करणारे बचत गट आता नवनवीन बाजारपेठांच्या शोधात आहेत. भारतातील बहुतेक सर्व राज्यात ही चळवळ पसरली आहे. यामध्ये महाराष्ट्र व पुणे जिल्हा आघाडीवर आहे. बचतगटांची संकल्पना स्वयंसहाय्यता गट यावर अवलंबुन आहे. ही संकल्पना प्रथम बांगलादेशात रुजली. नोबेल पारितोषिकाचे मानकरी डॉ. महमंद युनूस हे या संकल्पनेचे जनक. व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या या व्यक्तिला गरीबांबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर होता. देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करताना बहुतांश लोक कर्जबाजारी असून सावकाराच्या पाशात अडकली आहे . हे त्यांच्या लक्षात आले. अशा गरजूंना छोटी कर्जे विनातारण द्यावीत अशी योजना त्यांनी बॅंकांसमोर मांडली. परंतु बॅंकांनी ती फेटाळली. इतर कोणावर अवलंबुन रहण्यापेक्षा स्वतःपासुनच सुरुवात करावी या विचारातून डॉ. युनूस यांनी पाच महिलांना आर्थिक मदत केली. त्यांना कर्ज दिल्यानंतर त्यांना असा अनुभव आला की, या महिला प्रामाणिकपणे कर्जफेड करीत आहेत. इतरांकडे याचना करण्यापेक्षा याच समुहांनी बॅंक तयार करावी अशी कल्पना डॉ. युनूस यांच्या मनात चमकून गेली. याच विचारातून 1983 साली ग्रामीण बॅंकेची स्थापना झाली.
मावळ तालुक्यातही महिला बचत गट या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात महिलांचे सक्षमीकरण झाले आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिन्याला दोन ते तीन हजार रुपये महिला सहज मिळवतात. तसेच काही महिला बचत गटांकडून कर्जघेऊन आपला व्यवसाय सुरु करतात. अंगणवाडी, बालवाडीतील मुलांना अन्न शिजवून देणे ही एक रोजगाराची मोठी संधी महिलांना उपलब्ध झाली आहे. केवळ पापड आणि लोणच्यामध्ये न अडकता बचत गटातील महिला नवनवीन वाटा शोधत आहेत. तिकोना पेठ येथील महिलांचे हातसडीचे तांदुळ आता सर्वत्र लोकप्रिय झाले आहेत. त्याचबरोबर फिनेल तयार करणे, फाईल्स बनविणे, गणपतीचे साचे तयार करणे, पणत्या , आकाशकंदिल तयार करणे, राख्या बनविणे, नर्सरी चालविणे, केटरिंगच्या ऑर्डर्स मिळविणे, कपड्यांचा व्यवसाय, गांडूळ खत तयार करणे यांसारखे कितीतरी व्यवसाय महिला करीत आहेत. नाणे मावळातील आदिवासी भागातील महिलाही बचत गट संकल्पनेमुळे विकसित झाल्या आहेत. मावळ जत्रा, भीमथडी जत्रा आदीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना चांगली संधी मिळत आहे.
बचत गटांमुळे महिलांना आता कोणापुढे हात पसरावे लागत नाहीत. बचत गटांचे मुख्य उद्देश आहेत महिलांना सावकाराच्या पाशात अडकावे लागू नये व दैनंदिन बचतीची सवय लागावी. अडचणीच्या वेळी एकत्रित बचतीतून कर्ज मिळविण्यासाठी व वैचारिक परिवर्तन घडवून स्वबळावर उभे रहाण्यासाठी बचत गट स्थापन झाले. या मोहिमेमुळे दहा वर्षांत सुमारे 76 हजार गरीब कुटुंबांना अर्थसहाय्य मिळाले आहे. बचत गटांमुळे महिला साहसी बनल्या. एकमेकींच्या सुख दुःखात सहभागी होऊ लागल्या. त्यांच्यात सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. बॅंकांच्या कार्यपध्दतीची ओळख झाली. बचत गटांमुळे महिलाचे संघटन झाले. दहा पुरुष परवडले पण दोन बायका एकत्र येऊन काम करु शकत नाहीत. या विचाराला महिलांनी छेद दिला. 'थेंबे थेंबे तळे साचे' ही उक्ती प्रत्यक्ष जीवनात आली. या कार्याविषयी व बचत गटातील महिलांविषयी म्हणावेसे वाटते,
' बचतगटाने स्त्रियांच्या गुणांना मिळाला वाव,
घरात, समाजात तिचा वाढला की हो भाव '

No comments:
Post a Comment