किती वेगळ्या आहेत या भावना
ज्या मला शब्दांत बांधता येत नाहीयेत
कोणत्याही चांगल्या सुंदर गोष्टींचा आस्वाद घेताना
तुझी इतकी आठवण का येते?
या जगाच्या नियमावलीत माझं हे प्रेम बसत नसेलही
पण खरच मी त्याला काही करू शकत नाही
कारण खळाळत्या नदीसारखं माझं हे निरागस प्रेम
समु्द्राकडे धाव घेणारच ना
कितीही डोंगर. अडथळे आले
तरी शेवटी नदी समुद्राला मिळतेच ना
एका ठराविक चौकटीत वहा
असं वा-याला सांगता येईल का?
मग या मनाला कसं सांगु, बाबारे आता तुझे हे विचार बसव बर एका चौकटीत
करतीय प्रयत्न, पण खरच जमत नाहीये
कुणालाही त्रास न होता नदीला वहाण्याची इच्छा असते.
तसच माझं आहे
पण जसा नदीच्या नकळत पूर येतो आणि ब-याच गोष्टी वाहून नेतो
तसच माझं झालय.
माझी इच्छा नसताना माझ्या हातून बरच काही निसटुन गेलय
पण , जे आहे शाश्वत ठिकाण
ते मात्र तसच राहिलय तुझ्या रूपानी
म्हणूनच जे गेलय त्याचं दुःख करण्यापेक्षा
जे राहीलय तेच टिकवायचय मला.
खूप छान... मस्त...
ReplyDelete