नातं घट्ट करणारी..स्पेस
नातं कितीही घट्ट
असलं तरी प्रत्येक व्यक्तीला आपापली स्पेस हवी असते. काही काळापूर्वी स्पेस हा
प्रकार फॅड वाटत होता. अगदी मला सुद्धा. पण आजूबाजूची गर्दी वाढत गेली तसं जाणवलं
की, स्वत:चा वेळ मिळत नाहीये. स्वत:शी संवाद होत नाहीये. कुठेतरी खूप काहीतरी
निसटून गेल्यासारखं वाटत होतं. पण नेमकं काय? सगळं अगदी मनासारखं असताना सुद्धा रितेपणा
का जाणवतो? नीट विचार केल्यावर मला जाणवलं की, स्वत:ला वेळ देणं ही गोष्ट missing
आहे.
एरवी एकटेपणाला
घाबरणारे आपण एकटेपणा हवा असा वाटू लागतं. घरी, बाहेर, कामाच्या ठिकाणी सगळीकडे गर्दी.
रस्त्यानी निघालं तर कोणी ना कोणी ओळखीचं भेटतचं. कधी कधी याचाही वैताग येतो. जेव्हा
असं वाटतं असतं की कोणी ओळखीचं भेटू नये तेव्हा नेमकी खूप लोक रस्त्यात दिसतात आणि
विचारतात, काय आज एकदम निवांत? आणि गाडी नाही का आज, चक्क चालत? अशा वेळी असं
वाटत, please यार थोडी स्पेस द्या ना.
लोकलमध्येही
कित्येकदा असं होत की असं वाटत नेहमीच्या लोकलच्या डब्यात न बसता वेगळ्या ठिकाणी
बसावं म्हणजे ओळखीच कोणी भेटणार नाही आणि शांतपणे डोळे मिटून बसता येईल. पण नेमकं
तेव्हाच बऱ्याच महिन्यांनी भेटणारी मैत्रीण सगळी स्पेस व्यापून टाकते.
कामाच्या ठिकाणीही
नेमकं जेव्हा असं वाटतं की आज शांतपणे बसावं तेव्हा अचानक नको ती टार्गेट्स
उपटतात. लक्ष देऊन मनापासून (मनाविरुद्ध) काम करावं लागतं. असं काम केल्याची acting करता
येत नाही. स्वतःसाठी जो वेळ देण्याचं निश्चित केलेलं असतं त्या वेळात काम करावं
लागल्यानी मनातल्या मनात झालेली चिडचिड गिळण्यापलीकडे काही नसतं.
का हवी असते ही
स्पेस? शांत व्हायला... स्वत:शी संवाद साधायला... कारण so called प्रेमळ
माणसांमध्ये ही काही वेळा जीव गुदमरतो. हे सगळं का होतं? हे नाही कळतं. अपेक्षा
एकच असते, निदान जवळचे असे आपण ज्यांना समजतो त्यांनी तरी समजून घ्यावं. ही स्पेस कायम हवी असते
असं नाही. किंबहुना मनाची ही अवस्था अगदी थोडा वेळ टिकते. पण तेवढा वेळ हवा असतो.
संगीतात सुद्धा ताल देताना कालाला किती महत्त्व आहे हे आपण जाणतोच. भरतकाम किंवा
विणकाम करतानाही कापडावरील काही भाग रिकामा ठेवला जातो. त्यामुळेच त्या डिझाईनचं
सौंदर्य वाढतं. थोडी स्पेस जरूर असावी.
तिचा अतिरेक होऊ देऊ नये. नाही तर एकटेपणा वाढेल. एकमेकांना समजून घेतलं तर आयुष्य
किती सुंदर असेल नाही?
Very true Vinaya
ReplyDeleteThe Casino - JTH Hub
ReplyDeleteThe Casino 영천 출장샵 - JTH Hub | New York, NY | 원주 출장마사지 Hotel, Restaurants, Shopping, & more 밀양 출장안마 Casino. The Casino - 문경 출장샵 The Casino. 서귀포 출장샵 2.7/5.