मी माझी...
उद्या जागतिक महिला दिन आहे. तिच्याविषयी बऱ्याच गोष्टी बोलल्या जातील,
लिहिल्या जातील, तिच्याविषयी गौरवोद्गार काढले जातील. म्हणजे हे सगळं व्हायला
हवंच. पण मुळात स्त्रीला, तिच्या मनाला नेमकेपणाने कोणी समजू शकलं आहे का? अगदी
स्वत: ती तरी ओळखते आहे का स्वत:ला?
मला वाटत जागतिक महिला दिनी प्रत्येकीनी स्वत:चा शोध घ्यायला सुरुवात करायला
हवी. नाव, आडनाव, पैसा, करिअर यापलीकडे जी आहे तिला शोधायला हवं. स्वत:च्या गुणांचा, ताकदीचा स्वत:च्या आनंदासाठी
उपयोग करायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीत स्वत:ला दु:खी करणं थांबवायला हवं. उलट
लहान लहान गोष्टींमध्ये स्वत:चा आनंद शोधायला हवा. मला स्वत:ला माझ्या व्यतिरिक्त
कोणीही सुखी किंवा दु:खी करू शकत नाही; ही खुणगाठ मनाशी बांधायला हवी. स्त्री
स्त्रीची शत्रू असते हे वाक्य बदलणं आपल्या हातात आहे. एकमेकींना समजून घ्यायला
हवं. आपणच एकमेकींना समजून घेतलं नाही तर पुरुष वर्गाकडून ही अपेक्षा करणं चूक
आहे. ट्रेनमध्ये लेडीज डब्यापेक्षा जनरल डब्यात लगेच जागा करून दिली जाते किंवा
समजून घेतलं जातं, अशी वाक्य थांबवणं आपल्या हातात आहे. संवेदनशीलता हा दागिना
हौसेनी मिरवता येणं खूप आवश्यक आहे. मला कोणीही दुखावलं तरी माझ्या डोळ्यात टचकन
पाणी येतं म्हणजे संवेदनशील असणं ही चुकीची
धारणा मनातून काढून टाकून, सहसंवेदना जपणारी मी संवेदनशील असं समीकरण जमलं पाहिजे.
असं म्हणतात की, “जावे त्याच्या वंशा
तेव्हा कळे” मग आपण एकमेकींना किती कळलो आहे हे समजून घ्यायला हवं. असं वाटत की,
स्त्रीनी स्त्रीला समजून घेतलं तर पुरुषाला स्त्रियांना समजून घेणंसुद्धा सोपं
जाईल. मुळात कोणी आपल्याला समजून घ्यावं
यापेक्षा मी मला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. माझ्यात असलेल्या गुण दोषांसहित मी
मला स्वीकारलं की एक वेगळा आनंददायी प्रवास सुरु होईल. प्रत्येकीनी असं शोध सुरु
केला की तेजस्विनीच्या कवितेप्रमाणे जाणवेल....
खुशाल ती ही खुशाल आता, तिच्या नशेला रुबाब आहे.
तिला बिचारी करेल जो ही,
तिचा तयाला नकार आहे.
मातृ शक्तीला प्रणाम.....
ReplyDeletevery nice mam.
ReplyDeleteWow....Khup sunder ...Aaj swata kade pahawese vatat aahe ...Khup sunder ....
ReplyDeleteVery good.. Vinaya keep it up!
ReplyDeletemovie Thappad...just saw it.. Everyone must watch it..has a similar message
वाह ! खूप छान!!
ReplyDeleteखूपच छान !!
ReplyDelete